top of page
Smt. Priti Vaidya

डॉक्टर बाबा किनारामध्ये

काल दि. 30/06/2022 रोजी जागरुक वाचक कट्टा,तळेगाव गृपवरील वरील भास्कर माळी यांची निराधार बाबा तळेगाव चाकण रस्त्यावरील माळवाडी येथे बरेच दिवसांपासून रस्त्यावर वा दुकानाबाहेर रहात असल्याची पोस्ट वाचली..त्यानुसार लोकेशन घेऊन किनाराचे M.S.W आकाश व व्यवस्थापक उमेश शक्करवार तेथे पोहोचले. विचारपूस करुन बाबा गरजू असल्याची खात्री करुन किनाराची टीम संध्याकाळी बाबांना आणण्यासाठी पोहोचली. बाबा रोडच्या कडेला बसलेले होते. भिकारी समजून कोणीही बाबांना मदत करायला जवळ येत नव्हते. पायाला छोटी जखम झाल्याने चालणे वा उभे रहाणेही शक्य नव्हते. बाबांना त्वरित आधार मिळावा म्हणून किनाराच्या टीमने किनारा वृद्धाश्रम, अहिरवडे येथे आणून त्यांची माहिती विचारली असता धक्कादायक बाब समोर आली. बाबा उच्चशिक्षित डाॅक्टर M.B.B.S तसेच M.D आहेत. त्यांनी Karnataka Medical College मधून M.D केले आहे.ते उत्तम English भाषा बोलतात. उच्चशिक्षित M.D डाॅक्टर रस्त्यावर निराधार अवस्थेत सापडणे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माळी दादांना शतशः धन्यवाद ! 🙏बाबांना किनारात आधार देण्याचे भाग्य लाभले आहे. .🙏🙏🙏 आज 1 जुलै डाॅक्टर्स डे च्याडाॅ. हिरेमठ बाबांना अनंत शुभेच्छा!💐



15 views0 comments

Commenti


bottom of page