top of page

किनारा फिरता वृध्दाश्रम ह्या उपक्रमाअंतर्गत "एक पाडा एक चुल" ही एक नवीन संकल्पना

दि. 21/03/2023 रोजी किनारा फिरता वृध्दाश्रम ह्या उपक्रमाअंतर्गत खडकवाडी, शिवली येथील आदिवासी पाड्यावरील 11 कुटुंबांसाठी चैत्र पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर "एक पाडा एक चुल" ही एक नवीन संकल्पना राबविण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. येथील पाड्यावर किनारा वृद्धाश्रमामार्फत सलग 75 दिवस तयार जेवण देण्यात येत होते परंतु तेथील महिलांनी आम्हाला धान्य देण्याची विनंती केली. स्वतः एकत्रित येऊन स्वयंपाक करुन संपूर्ण पाड्यावरील कुटुंबांना जेवण देण्याची तयारी दाखवली. त्यांना या साठी लागणारे सर्व साहित्य, भांडी, गॅस व दरमहा लागणारा भाजीपाला तसेच धान्य, किनारा वृद्धाश्रमात येणार्या देणगीतूनच दिले जाणार आहे. दर आठवड्याला धान्य व भाजीपाला देण्यात येईल. यामुळे पाड्यावरील लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना नक्कीच फायदा होईल. एकूण 25 लहान मुले व 25 इतर व्यक्ती असे 50 लाभार्थी आहेत.

0 views0 comments
bottom of page