top of page

किनारामध्ये बाबांचे मनःपूर्वक स्वागत

दि.22/06/22 रोजी तळेगाव चाकण महामार्गावरुन जात असताना इंदुरी गावाजवळ, कचरा शोधत एक वयोवृद्ध बाबा आम्हाला दिसले...अत्यंत खराब कपडे व अवस्था पाहून ते गरजू असल्याचे प्रकर्षाने जाणवले म्हणून आम्ही गाडी थांबवून चौकशी केली..सदर बाबांना वृद्धाश्रमात येता का म्हणून विचारले तर त्वरित होकार देत ते आमच्या गाडीत बसले..बाबांना किनारात घेऊन आलो आहोत..बाबांचे नाव श्यामसुंदर गुप्ता असून बाकी जास्त माहिती आठवत नसल्याने सांगू शकत नाही..किनारातील निवासी डाॅक्टर, निवासी GNM ब्रदर यांनी वैद्यकीय तपासणी केली व निवासी Driver सोनी गोपाल व Manager उमेश शक्करवार यांनी बाबांना स्वच्छ करुन त्यांचा कायापालट केला. आधीचे व आवरल्या नंतरचे बाबा यात अमुलाग्र बदल झाला आहे.

अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करुन बाबा रागाने घर सोडून आले की चुकून रस्ता विसरल्याने भटकले आहेत याची कल्पना नसल्याने त्यांचे कुटूंबीय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.. नातेवाईकांचा शोध न लागल्यास कायमस्वरुपी किनारातच सांभाळ करणार आहोत. बाबांचे किनारा परिवारात मनःपूर्वक स्वागत!


16 views0 comments
bottom of page